स्त्रियांचे अलंकार आणि अर्थ

स्त्रियांचे अलंकार केवळ त्या सुंदर दिसाव्यात म्हणून आहेत की त्याचा काही विशिष्ट अर्थ आहे ? बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मला जाणून घ्यावीशी वाटतात.

१. कुंकू (टिकली) लाल रंगाचीच का वापरली जाते ? तेच कारण गंधासाठी आहे का ?

२. मंगळसूत्रात दोन वाट्या का असतात ? त्यांचा अर्थ काय ?

३. मंगळसूत्र सोन्याचेच का बनवतात ?  सोने नकारात्मक विचार शोषून घेते का ?

४. त्यात काळ्या मण्यांचे काय महत्त्व आहे ? त्यांची संख्याही महत्त्वाची असते का ?

५. जोडवे चांदीचेच असतात का ? असल्यास कारण काय ?

६. इतर काही.

जालावरील दुवे असल्यास जरुर द्यावे.

धन्यवाद.