एक जुनी आठवण

सकाळचे साधारण
साडेचार वाजलेत .
"प्रभाते मनी राम चिंतित जावा
पुढे वैखरी राम आधी वदावा।
सदाचार हां थोर सांडू नये तो
जनी तो ची तो मानवी धन्य होतो "
.....थंडीने कुडकुडाणाऱ्या
स्वरात उमटणारे काही श्लोक ..

असपष्ट धूसर सा संधीप्रकाश..आणि
काही साखरझोप मोड़णारे गजर.....

इतक्यात एक हाक
"जय जय रघुवीर
समर्थ "

मग मी -" आज्जी ,चैतन्य आलाय ,आम्ही गडावर चाललोय , परत
येवू की नाही माहीत नाही...."
आज्जी -"जास्त नाटकं नको .....गडावर
रहाणार असल तर फ़ोन करून कळवा "
मी -" हां हां हां "
"जय जय रघुवीर
समर्थ "
***************************************************************
"जय
जय रघुवीर समर्थ "
"जय जय रघुवीर समर्थ.....प्रसाद, दर वेळी लेट करतोस
...अता चल पटा पट ...नाहीतर प्रातः पूजा चुकेल।"

"सज्जनगडाचं ना
काहीतरी गणितच वेगळ आहे"।

"काही तरी अनामिक ओढ़ आहे यार..."

"हो
यार ... अरे कधी तरी यार शिवथर घळीत जायच आहे ।"

" हो। आणि निवांत
वेळ काढून एकदा पावस ला जाऊं येवुया "
 साधनेसाठी ती सर्वोत्तम जागा आहे  !!

अशाच काही तरी गप्पा होत होत आम्ही समर्थ
महाद्वारापशी येतो अन् गप्पांचा ओघ आपोआप थांबतो...भक्ती भावने आपोआप मान
झुकाते . कुठे तरी इतिहासात मन पार डुंबुन जातं.....

" इथे
समर्थ असतील तेव्हा काय जागा असेल ही !!!"
" पाहटेची काकड आरती 
   मग नैमित्तिक उपासना , दासबोध आत्मारामची निरुपणे
   सायंकाळची करुणाष्टके ... मग शेजारती ..... आणि  मग  " रामीं हो रामदासी समाधी लागली ...... " या अवस्थेत सारेच जण तल्लीन ..

कशी असेल यार ती अवस्था ...? "

यावर चैतान्याच उत्तर-
"...................................................................."

मी
-" अरे बोल की "

चैतन्य -" ...............परब्रह्म आदिअंति
अनुर्वाच्य ........"

मी -" .............................. ................."

*********************************************************
ध्यानमंदिर
एक
प्रकारचा 'गंभीर' अंधार
अन् अशात समईच्या मंद प्रकाशाने उजळून निघालेली
समर्थांची समाधी !!

"आता सद्गुरु वर्णवेनाजेथे माया स्पर्शु शकेना
ते स्वरुप मज अज्ञानाकाय कळे ।। श्री राम ।। "

त्या गंभीर आवाजाने सार वातावरण भारुन टाकलय...

"उपमे द्यावा जरी मेरुतरी तो जड़ पाषाण कठोरु
तैसा नव्हे की सद्गुरुकोमल दिनांचा ।। श्री राम ।।

हे सगळ इतक भावोत्कट की अंगावर रोमांच उभे
राहिलेत हां अनुभव ही कसा कधी कोठे विरून जातो लक्षातच येत नाही !!

म्हणोनी सद्गुरु वर्णवेनाहे गे हेची माझी वर्णना
अंतर्स्थितिचिये खुणाअंतर्निष्ठ ची जाणती ।।श्रीराम।।


जय जय रघुवीर समर्थ ॥
***********************************************************

मग
आम्ही धाब्याच्या मारुती कड़े जातो ...
समोर पसरलेला उरमोडीचा जलाशय ।
इथे
का कोणास ठावुक पण मन पार अंतर्मग्न होता ।
बोलावासचाच वाटत
नाही.....मगाचाचे सद्गुरुस्तावानाताले श्लोक मनात रेंगाळत रहातात ....
समोर
पसरलेल्या निळ्याशार जलाशया कड़े बघत कधी भाव समाधी लागते कळतच नाही....

पण
मग थोड्यावेळाने पोटातले कावळे काव काव करायला लागले की आपोआप सामाधी
मोडते....

मग भोजन प्रसाद गृहात भोजन बंधुंच्या भाऊगर्दीत प्रसाद
घेताना लक्षात येत की गडाच्या महाद्वाराशेजारी अस का लिहिलय.....

।"तू विवंचना मुक्त होण्याचे स्थान आहेस ....पण ....पुन्हा तूच
विवंचना युक्त आहेस !"
असो !!!
इतक बोलून सगळेच भक्त त्या
विवंचना विसरून जातात ...आणि त्या सगल्या भक्तातले आम्ही ही एक असतो !

मग
सरळ आम्ही श्रीधर कूटीत जातो .....
श्रीधर स्वामिंच्या विचाराने
आणखीनच कसस होता।
" चैतन्य ,आपण अस ,श्रीधर स्वामींसारख का नाही रे
करू शकत ???"
" तेवढी पुण्याई अजुन जमाली नाही मित्रा !!!
अजुन खूप
लहान आहोत रे !!!
पण
तुझ ही खर आहे रे कित्ति दिवस दूर रहायच बाप्पा
पासून ???

अजुन कित्ती दिवस??? सद्गुरु सद्गुरु .......??? "

सद्गुरु विण जन्म निर्फळसद्गुरुविण दू: सकळ
सद्गुरु विण तळमळजाणार नाहीश्रीराम

मग पुन्हा एकदा तीच गंभीर शांतता मनाला
भारुन टाकते.
पण कुठे तरी खोलवर चालु असलेली विचारांची द्वन्द्व चालूच
रहातात .

मग आम्ही दोघे ठार मुक्या सारखे चुपचाप गड उतरु लागतो .
*************************************************************

संध्या
काळी घरी पोहचतो तेव्हा तस्साच तो संधिप्रकाश पुन्हा भरून राहिलेला
असतो।
आज्जी -" आलात का महाराज ! काय खायला काही पोहे ,उप्पिट करू ???"

मी
न कळत काही तरी उत्तर देवून जातो ! माझ्या ही लक्षात येत नाही !
आज्जी
देवा पुढे दिवा लावते ...मग स्वयंपाक घरात जाते ....

कंद्यापोह्याच्या
वासाने पोटातले कावळे परत जागे होतात ।
आज्जी काहीतरी गुणगुणत पोहे
आणून देते ।
आज्जी चे गुणगुणनारे शब्द स्पष्ट होता जातात ......

"कल्याण करी रामरायादेवराया ,कल्याण करी रामराया

जनहित विवरी ,कल्याण करी रामराया ॥ "

***************************************************************
( पुर्वप्रकाशित :बुधवार १ ओटोबर २००८  दुवा क्र. १ )