"सावली"
भ्रष्टाचाऱ्यावरी सावली, पक्षश्रेष्ठी हे धरी॥ध्रु॥
जरी घोटाळा कोणता केला।
अभयदान हे देती त्याला॥
मंत्रीपद काढून घेऊन, नेमी मंडळावरी॥ध्रु॥१॥
जनता बिचारी भोळी भाबडी।
त्यांना न कळे यांची लबाडी॥
लोकसभेचे तिकीट न देता, पाठवी राज्यसभेवरी॥ध्रु॥२॥
असा आदर्श तरुणाईला।
देश जातसे अधोगतीला॥
रक्षण्या या देशा देवा, घे अवतार त्वरी॥ध्रु॥३॥
अनंत खोंडे.
१\५\२०१०.