ऐका सर्व जनहो, भ्रष्टाचारी लोकांची कथा
माहित होईल जनतेस, काय असते प्रथा
सरकारी कचेऱ्या असती, चरण्याची कुरणे
कर्मचाऱ्यांना माहित असे, फक्त खिसे भरणे
कलेक्टर, मामलेदार, कोर्ट, रजिष्ट्रार कचेरी
म्युनिसिपालैटी, झेड. पी. यांची यात हजेरी
लाच दिल्याशिवाय, कचेरीत कर्मचाऱ्यांना
काम होत नसे पहा, शाप असे कार्यालयांना
असती झाली नेमणूक, यांची लाच देऊन
भाग पडते याना, खर्च काढणे लाच घेऊन
लागेबांधे यांचे खूप, असती वरीष्ठ राजकीय
हप्ते पोहोचवून होती, निर्धास्त पाहा स्वकीय
निर्भयता, अरेरावी येई, ती यांच्या वागण्यात
बिनदिक्कतपणे करती कामे, उघड तोऱ्यात
लाचलुचपत प्रतिबंध कक्ष , असे सरकारकडे
मर्यादा असे यांची, पकडती शिपाई फाकडे
अधिकारी मात्र जाती, सुटून यातून अलगद
राजकीय लागेबांध्यांचा, उपयोग होई जलद
लढण्याची तयारी नसे, जनतेची ती खरोखर
फायदा याचा उठवती, भ्रष्टाचारी हो पुरेपूर
असे सरकारी यंत्रणाच, संपूर्ण पाहा भ्रष्टाचारी
कुचेष्टेस पात्र होती, ते प्रामाणिक कर्मचारी
कोण वाचवणार या, भ्रष्टाचाऱ्याच्या राक्षसास
वाचवणाऱ्यासही गुंफतील, आपुल्या माळेस