लावले मी ते न माझे नाव होते;
खेळलो नावास माझे डाव होते.
केवढया वाटा इथे रेंगाळलेल्या;
केवढयाने घातलेले घाव होते.
जेथल्या मातीवरी मी प्रेम केले;
तेच माझे वादळावर गाव होते.
जन्म होता झाकताना फाटलेला;
चढी बोली लावीत बाजार होते.
मम फासे टाकताना जाणले मी;
नियतीने खेळलेले डाव होते.
श्वापदांना लक्तरे माणूसकीची;
माणसांनी आणलेले आव होते.