तू

तू

तुझ्या स्पर्शाने चित्तवृत्ती फुलत होती

तुझ्या आठवणीने मनोवृत्ती खुलत होती

गेलीस सोडुनी तू स्वप्ने बोलवितं होती

तुझ्या वियोगाने प्राणज्योत मालवत होती

दारावरून तुझ्या अंतयात्रा माझी जात होती

पाहण्यास तुला मान सारखी कलत होती