मन

सुख टाळी द्यायला सरसावते
आणि त्याच वेळी जपायचे असतात मला हातांवरचे फोड
चाके लावून किल्ली देऊन तयार असते माझे मन
एका लाँग ड्राइव्ह करता
आणि काही केल्या बंद होत नाहीत ह्या खिडक्या
ही दारे, घरातले दिवे आणि पत्रासाठीच्या फटीतून
ओतत राहतात थकलेली बिले...
उपसत राहतो मी घर थोडे पाय टेकवण्यासाठी
मन शोधत राहते फट माझ्या कर्दळ-कातडी मध्ये
एक उंची वाइन सरकवतो घशात लाच म्हणून कदाचित लाचार म्हणून देखील
पण लय संपलेल्या क्षणाशी मन उभे असते
सुन्न विकल...
निसर्गाने दिलेली नखे घासत, रंगवत.
सुखाचे मुखवटे जागोजाग सजवतात भिंती कोपरे
आणि वेश्येसारखे माझे मन सरावाने

चाके लावून किल्ली देऊन तयार असते एका लाँग ड्राइव्ह करता