गझल - लोकशाही

आहे बरेच काही
पण माहितीच नाही

वर्षानुवर्ष खटले
कोमात लोकशाही

स्वप्नात शर्ट आला
सरसावलीच बाही

अनुभव मुळीच नाही
सध्या फुलेच वाही

केला नवीन रस्ता
आले खणायलाही

बोलायचेच नव्हते
मग बोललोच नाही