फेरफटका

गेलो आरण्यात खडतर

तुडवित वाटा,अरूंदसर
पोहोचलो वर टेकडीवर
पाहिला निसर्ग चमत्कार
गर्द झाडांच्या कोंदणात
हिरा सरोवराचा साक्षात
रश्मी भास्कराची स्पर्शत
झळाळे कसा आसमंतात
पाहताच दृष्य, अलौकिक
दिपले नयन दोन क्षणिक
चित्र रेखाटले होते मोहक
विश्वकर्मा असे हा भावुक