कृष्णा धाव रे...

कृष्णा धाव रे..

तू उद्धरलेस पुतणेला

जागलास दुधातील विषाला

येथे भाववाढीची स्पर्धा दुधाशी

अनेक बालकृष्ण उपाशी

कृष्णा धाव रे..

तू सोडविलेस कंसाला

उद्धरलेस आपल्याच मामाला

येथे आयुष्याचे कंस सोडविता

नाकी नऊ आले आम्हाला

कृष्णा धाव रे..

तू उद्धरलेस कुब्जेला

केलेस सरळ अष्ट्वक्रेला

येथे सगळेच वाकडे

सरळ कोणी भेटेना

कृष्णा धाव रे..

तू मोडुनी एक काडी

विलग केलेस जरासंधाला

येथे आपलेच लोक करिती काडी

भाऊ भेटेना भावाला

कृष्णा धाव रे..

तू केलेस सारथ्य पार्थाला

सांगुनी गीता रणांगणी

येथे सज्ज सहस्त्रअर्जुन

गीतेचे सार कळेना

कृष्णा धाव रे..

कृष्णा............