प्रेमझरा

मागितलेले सर्व काही मनापासून देणं असतं

सढळ हाताने देताना प्रेम म्हणजे घेणं नसतं

कोणासाठी जगणं म्हणजे आयुष्याचं सोनं असतं !

तुझ्यामुळेच कळला मला प्रेमाचा हा अर्थ खरा

कितीही वाटून प्रेम यातले वाहत राहील प्रेमझरा !!