(माझा 'एकाच या जन्मी जणू फिरुनी नवे जन्मेन मी' ह काव्यसंग्रह प्रायोगिक तत्त्वावर प्रकाशित झाला असून त्याचे मुल्य ७० रुपए आहे. (पोस्टल चार्जेस वेगळे). तरी कोणला तो हवा असल्यास मला ९९२२५०८९७५ या नंबरवर संपर्क साधावा. यात माझ्या शंभर कविता आहेत.)
माझ्या तुझ्या प्रेमात फरक वाटतो इतका
वेडा उगा विश्वास क्षणिक वाटतो इतका.
वाटा तुझ्या जगात जगत चालले जितकी
झाला मलाच भास छळत हासतो इतका.
जेव्हा तुझा लळा भिनवत थांबले जितकी
तेव्हा तुझा शब्द अलगद सांडतो इतका.
श्वासात तू किती शिल्लक मोजते जितकी
प्रश्न मनास हा दुखवत राहतो इतका.
आता मला इथे अडवत राहते जितकी
तेव्हा तुझा रस्ता भरकन धावतो इतका