झाडामधी एक झाड सारी पानं झडलेलं
त्याच्या एका फांदीवर घरटं ते मोडलेलं
चिमणी ती गेली रागे चिमण्याची झाली चीता
मोडक्या त्या घरट्याची मोडकीचं आहे कथा
किलबिल सरली ती चिव चिव उरे आता
घरट्यात पिलाची त्याची त्याला ठावे व्यथा
सावली रुसली ती वेढताती त्याला झळा
पिलामनी तळमळ डोळा पाणी घळघळा
टांगलेले घरटे ते जीव त्यात टांगलेला
जिव्हाळ्याचा थवा तो कुठे सारा पांगलेला?
सावराया नाही कुणी नाही कुणी आवराया
मोडके घरटे त्याचे जप तूच देवराया