झोका

झोका

दे उंच झोका

टेकवू दे नभा पाय

आभाळाला लावू दे

मातीचे पाय

दे उंच झोका

वाजू दे थंडी

चांदोबाबरोबर इंद्रधनुशी

खेळेन घसरगुंडी

दे उंच झोका

घेईन नभाचा मुका

होईल आसमंत गुलाबी

चंद्र पडेल फिका