काल ज्या क्षणी तुला मी पाहिले प्रिये

काल ज्या क्षणी तुला मी पाहिले प्रिये
त्या क्षणी हृदय तुला मी वाहिले प्रिये
दु:ख ते कुठे कधी मला न लाभले
गाठण्या तुला बरेच साहिले प्रिये
तू कठोर बोलते तुला विसर पडे
खोल घाव मन्मनात राहिले प्रिये
संकटे तुझ्या विना असंख्य ग्रासती
संकटास आज मीच त्राहिले प्रिये
बोलशी जरी न तू ,सशंक नेत्र का ?
'' कैल-आस'' हा तुझाच ग्वाहिले प्रिये .... ( कैल-आस = कैलास )
-डॉ.कैलास गायकवाड