आठवण

            आठवण

भळभळते जखम अजुनी ओली आहे
खिशात माझ्या अजुनी सदाफुली आहे

अवचित आलिस अन अवचित गेलीस तू
श्रावणातील उनसावली खेळलीस तू

मुग्ध हास्य तुझे फुले फुलविलीस तू
किती सहजतेने निघून गेलीस तू

आठवणीत तुझ्या अजुनी जळतो आहे
डोळ्यातून अजूनी श्रावण गळतो आहे