मसाला चिप्स (१)

  • टोर्टिया चिप्स
  • बटाटे, कांदे, लसूण, मिरची, कोथिंबीर, लिंबू, मीठ व साखर (सारण बनवण्यासाठी)
  • बारीक चिरलेला लेट्युस
  • बारीक चिरलेली काकडी
  • सालसा
  • किसलेले चीझ
  • मीठ व साखर चवीपुरते
  • शेंदरी रंगाच्या गाजराचे बारीक गोल काप साले काढून(सजावटीसाठी)
  • पालकाची छोटी पाने (सजावटीसाठी)
१५ मिनिटे
ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात


बटाट्याचे  सारण: बटाटे उकडून, त्याची साले काढून कुस्करून घ्यावेत. त्यात कांदा, लसूण पाकळ्या, मिरच्या व कोथिंबीर खूप बारीक चिरून घाला, लिंबू पिळावे. चवीपुरते मीठ व साखर घाला व ह्या सर्व मिश्रणाचा लगदा करावा. हे बटाट्याचे सारण तसेच कच्चे राहू देत.

सर्वात आधी एका डीशमध्ये गाजराचे गोल व बारीक काप ठेवा. मध्यावर पालकाची पाने लावून घ्या. मग त्यावर एकेक टोर्टिया चिप्स ठेवा. नंतर प्रत्येक चिप्स मध्ये सर्वात आधी बटाट्याचे सारण घाला. नंतर चिरलेला लेट्युस व काकडी घाला. नंतर सालसा व सर्वात शेवटी किसलेले चीझ घाला. चवीसाठी थोडे मीठ व साखर पेरा. अशी ही एक छान सजलेली चमचमीत डीश तयार होईल.

नाहीत.

स्वानुभव