मसाला चिप्स (२)

  • टोर्टिया चिप्स
  • बटाटे, कांदे, लसूण, मिरची, कोथिंबीर, लिंबू, मीठ व साखर (सारण बनवण्यासाठी)
  • चिंचगुळाचे दाट पाणी
  • लाल तिखट
  • धनेजीरे पूड
  • मीठ
  • साखर
  • लिंबू
  • कोथिंबीरीची पाने (सजावटीसाठी)
  • बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो
  • बारीक शेव
१५ मिनिटे
ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात

बटाट्याचे  सारण: बटाटे उकडून, त्याची साले काढून कुस्करून घ्यावेत. त्यात कांदा, लसूण पाकळ्या, मिरच्या व कोथिंबीर खूप बारीक चिरून घाला, लिंबू पिळावे. चवीपुरते मीठ व साखर घाला व ह्या सर्व मिश्रणाचा लगदा करावा. हे बटाट्याचे सारण तसेच कच्चे राहू देत.

सर्वात आधी एका डीशमध्ये कोथिंबिरीची पाने सजावटीसाठी टेवा. नंतर एकेक टोर्टिया चिप्स ठेवून त्यात आधी बटाट्याचे सारण व चिंचगुळाचे दाट पाणी घाला. नंतर बारीक चिरलेला कांदा व टोमॅटो घाला. किंचित लाल तिखट, धनेजीरे पूड पेरा. चवीप्रमाणे थोडे मीठ व थोडी साखरही पेरा. नंतर एकेका पुरीमध्ये थोडी बारीक शेव घाला. नंतर अगदी थोडे लिंबू पिळा.

ह्या चिप्स पाणीपुरीच्या पुरीला एक पर्याय होऊ शकतो. जसे आपण शेव बटाटा पुरी खातो याप्रमाणेच असे करूनही खाता येईल.

नाहीत.

स्वानुभव