करुण चेहरा तृतीयपंथीचा
खरे तर,
नेहमीचा एक मस्तवाल चेहरा
पण, आज रंग उडालेला
नेहमी असतो एक सप्तरंगी उग्र भाव
आणि असतात अंगावर धावून येणारे भाव
असे वाटत होते
आज हा चेहरा, चुकला आहे आपले गाव
मला आशीर्वाद देईन म्हणाला,
पण पैसे दिले तरच,
नाहीतर नडेन, वाट्टोळ्ळ करीन म्हणाला
मी म्हणालो,
वेड्या, तुला गरज आहे मदतीची
मला कसली भीती दाखवतोस?
स्वतःला देव समजतोस!
मग तुझे आयुष्य का असे वाया घालवतोस?
मला माहित आहे, तुही माणुस आहेस
माणुसकीचा अन लिंगाचा काहीही संबंध नाही
पण मारलास तु तुझ्यातला माणुस
ठार मारलास,
वर टाळ्या कसल्या वाजवतोस?
लोकांना घाबरवतोस?
कष्ट करायची तयारी नाही
आणि दुष्ट करायची तयारी नाही
जगाची हेटाळणीची नजर
माणुसकी जाळते म्हणतोस?
असे असेल तर,
मी तर माणुस शोधतच फिरतो
पण येताजाता लाथा खातो
भीक नाही, मी दान मागतो
आणि तरीही मी माणुस नाही
माझ्या शब्द्दांच्या भडीमाराने
आतून कोसळला तो
कळवळला, म्हणाला,
चल, तुला आज फुकट आशीर्वाद देतो
मुक्त होशील तु ह्या जन्म-मृत्युच्या चक्रातून
पण मग मात्र मला विसरू नकोस,
माझेही भले कर
आज उडवलास तसा,
माझ्या चेहऱ्याचा रंग उडवू नकोस
आणि तृतीयपंथात माणुसकी राहिली नाही
असा ऊर बडवू नकोस