प्राणपक्षाची जात

धडामकन बसली
धडक वाहनाची
अन तो ऊंचच ऊंच उडाला
आकाशातल्या देहाला
एक पक्षी सांगून गेला
खाली पडायला

प्राणपक्षी देहातला
हळुच वरच्यावर सटकला
हवेत विहार करू लागला

नव्याने येणारे
आपल्यासारखे दिसणारे

तो शोधू लागला

उडालेल्या देहाचे हृदय मेंदू बंद
हालचाल बंद आणि चिरेबंद
देहाच्या चिंध्या झलेल्या

खाली पडल्यापडलल्या
देहाभोवतीची माणसे
शोधू लागली
समान त्यांच्यासारखी दिसणारी पिसे

आकाशातही तेच
जमिनीवरही तेच

मरणापुर्वी, मरणानंतर
सतत गलिच्छ राजकारण
आणि
भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाने
उडविलेली
रक्तबंबाळ जातियतेची समीकरणं