विवाह

भारतीय जीवनातील एक मंगल व गोड संस्कार

नुसताच मंत्र म्हणून साजरा होणारा - नव्हे नव्हे!

जीवन सरितेचा ऒघ संपूर्ण बदलून टाकणारा..........

दोन सरितांच्या संगमातून

जन्म देणारा स्फूर्तीला, उन्मेषाला...........

मात प्रेमाच्या महान मंगल स्त्रोत्राला प्रारंभ करणारा.............

भोगातून त्यागाची शिकवण देणारा............

अग्नीला साक्षी ठेवून

परस्परांना मंगलसूत्रानी बांधून ठेवणार....................

वडिलधाऱ्यांचा आशीर्वाद घेऊन

फळाफुलांनी सजवणारा

घराला घरपण आणणार

स्वभावाचे काने कोपरे झिजवून

केवळ निष्ठेवर जगायला शिकवणारा..........

गुलाबा बरोबर काट्यांची आठवण करून देणारा

कुटुंब संस्थेला, समाजाला आवश्यक असा हा महामंगलमय, पवित्र, शुभंकर, संस्कार...............