भिजलेली स्वप्ने

भिजलेली स्वप्ने

विश्वासघात कोणी कोणाचा केला


का केलास माझ्यावर आरोप

अशाच एका कोसळणारया रात्री
घेतलास ना निरोप ?

स्वप्ने माझी पण होती
होते तयांना पंख
मोडुनी तयांसी
का मारलास डंख ?

विझलेल्या डोळ्यात 
आहेत स्वप्ने विझलेली
विझलेल्या डोळ्यात 
आहेत स्वप्ने भिजलेली