प्रेरणेला, सांग, पटवावी कशी ?

प्रेरणा : कोहम्‌ ह्यांची कविता "प्रेरणे, देऊ
तुला चावी कशी ?
"

प्रेरणेला, सांग, पटवावी कशी ?

टांग त्या कवितेस मी द्यावी कशी ?

 
स्वच्छ कागद नासतो बाळापरी

अक्षरांची धिंड काढावी कशी ?

 
आदळी जर हिमनगावर कल्पना

शब्दटायटॅनीक वाचावी कशी ?

 
काय ह्या अवजड विचारांचे करू ?

लेखनाची सूज उतरावी कशी ?

 
चालवूही शब्दवरवंटा अम्ही

काव्यचटणी फार वाटावी कशी ?

 
आतला लेखक असे जर संपला

वाचकांनी वाहवा द्यावी कशी ?

 
खोडसाळा, बेकरीला ये जरा

पाव, खारी त्याविना खावी कशी ?