" चतूर कावळा"
एकदा लागली कावळ्याला खुप तहान।
कुठे ना दिसे पाणी तो हिंडे रानोरान॥
एक दिसले त्यास मातीचे भांडे।
त्यात होते पाणी खुपच थोडे॥
काय करावे त्या काही सुचेना।
पाणी पिणे त्या काही जमेना॥
तेव्हा त्यास युक्ती सुचली एक।
त्याने खडे जमा केली अनेक॥
भांड्यात टाकी तो एकेक खडे।
तसतसे पाणी वरवर चढे॥
भागवली तहान पिऊन पाणी।
गेला उडून तो दूर रानी॥
टीप ही बाल कविता १९८४ साली लिहली आहे.
अनंत खोंडे.
१४\६\२०१०.