हृदयाभोवतीच पडले नैराश्याचे कुंपण
उसन्या पोकळ ऊत्साहाने साजरा केला सण
सत्यास सामोरे जाण्याचा दवडला तो क्षण
स्फुर्तीनेच केला आज आत्महत्त्येचा प्रयत्न
आशेचा आक्रोश चिरडला चिलटा झुरळांनी
ईच्छेलाच अस्वस्थ केले मत्सराच्या जंतूंनी
उसळलेल्या उमेदीची केली मनात लावणी
फुटलेल्या कोंबाने सहज ओलावली पापणी
टोमण्यांचा कुत्सित पाला, शब्दांचे झाले खत
देखणे कोंबच उगवले सळसळत डोळ्यादेखत