चिडलेला पाऊस

तुझ्याविना हा पाऊस चिडून अबोल अबोल
रागावून रात्रभर माझ्या डोळ्यांत दाटलेला

शब्दांना कळा आली गेले भांडून दूर दूर
पावसात वाऱ्याने अंगणीचा ढग चोरलेला

काळेकरडे आसमंत नि डोळे ओले ओले
तुझ्या परतीत घे सोबती ढग माझा हरवलेला