तो म्हणतो.... "माझ तुझ्यावर खर आणि खूप प्रेम आहे "
मलाही वाटत.... खरय... माझा... माझ्यापुरताच आहे हा...
कोसळतो धो धप्प -
नजरेसमोर सार काही अस्पष्ट होत
कुणी कुणाला दिसत नाही
कुणी कुणाला कळत नाही
जोडत जातो सुटलेले, तुटलेले (की सोडलेले, तोडलेले? )
खूप काही.... हळुवार....
स्पर्शातून पोहचवतो... त्या त्या ठिकाणी
रेंगाळतो माझ्यासोबत.... माझ्यासाठी
खूप रडू येत... जीव कसानुसा होतो... बघावं तर तो हि तसाच..
रडवेला झालेला... दोघेही रडतो... खूप रडतो... खूप वेळ रडतो
त्याच्या सोबतीत रडता येत... ह्याचंच छान वाटत असत....
खूप वेळाने स्वतःशीच बोलतो.....
"ज्याने त्याने ठरवायचं - थांबायचं की निघून जायचं -
गुंतण्याचा प्रश्न उरावाच का? "
असा कसा हा.... माझाच प्रश्न
उत्तर म्हणून मला देऊन जाणारा!