रेंगाळलेला असा एक दिवस
अंगावरच्या ओल्या कपड्या सारखा
भिजलेल्या अंगाला स्पर्शणारा स्पर्श
डोक्यातील विचाराला चिकटलेला
रेंगाळलेला असा हा दिवस
तसाच तस्साच !
टप टप पडणारे पावसाचे थेंब
आडोशाच्या गळक्या छपरातून
ओघळणारे डोक्यावरचे पाणी
आतल्या कापडांना भिजवणारा
रेंगाळलेला असा हा दिवस
अगदी, अगदी तस्साच !
कडू लिंबाच ओल ठीपकत झाड
सर सर करत वाहणारा वारा
ओल्या देहावर झेलतांना तो
शीर शिररी कपड्यातून डोक्यात आणणारा
रेंगाळलेला असा हा दिवस
खरच! अगदी तस्सा !