नाही म्हणाला!

कायरे तू जेवलास का?

           तर तो चक्क्क नाही म्हणाला

जेवणाचेच काय एवढे म्हणा

          तो तर लाजायचंच नाही म्हणाला

पोटाला भूक लागली तर माझा काय दोष?

          म्हणून तो खोट हो म्हणायचं नाही म्हणाला

मी म्हणालो मला जमेल कारे तुझ्या सारखं

          मला तर तोंडावर चक्क नाही म्हणाला

अरे लबाडांच्या दुनियेत जगणारे तुम्ही

           खर! तुम्हांला जमणार नाही म्हणाला

ताकाला जाऊन भांडे लपवणारे तुम्ही

          खर तुंम्हाला पचणार नाही म्हणाला

कोणत्या जगात राहतो, ये आमच्या दुनियेत

       लगेचच तुला नाही सांगत म्हणत

जेवणाचा घास तोंडात घालत

      खोटारड्यांच्या जगात येत नाही म्हणाला.

आवाक होउन मी पाहतच राहिलो

        ऊठून हात धुत परत तुझ्याकडे नाही येणार म्हणाला.