फार उशीर झाला ... आता तसं बघितलं तर हातात काहीच उरलं नाहीये माझ्या... अस का होत.. समोर सगळं घडत असूनही आपण इतके हतबल का होतो ... का काही पर्याय दिसतच नाही समोर...राहतात फक्त आठवणी ... त्या मात्र कधीच साथ नाही सोडत.. आपण कितीही टाळलं तरी सुद्धा..
त्याचा ऑफिस चा पहिला दिवस आजही माझ्या लक्ष्यात नाहिये.. कारण विशेष अस काहीच वाटलं नव्हत मला.. उलट मी कधी त्याच्या प्रेमात पडेल असा विचारही माझ्या मनाला शिवला नाही .. आमची नेहमी खूप दंगा मस्ती चालायची ... सुरुवातीला मला खूप राग यायचा... पण नंतर नंतर जेव्हा कधी तो ऑफिस मध्ये नसेल तेव्हा तेव्हा चुकल्याचुकल्यासारखं वाटायचं...
आमची खूप छान मैत्री झाली ...आम्हाला दोघांनाही खूप अभिमान वाटायचा ... आणि आजही तितकाच आहे... पण आज परिस्थिती खूप वेगळी आहे...
हळू हळू मी कशी गुंतत गेले माझं मलाच कळलं नाही ... त्याच्या फोन ची , मेसेज ची सतत वाट पाहू लागले... फोन वाजला की वाटायचं त्याचाच असेल ... आणि असायचाही.. पण ... समजायला मला फार उशीर झालं... तो फक्त एक खूप चांगला मित्र म्हणून माझ्या जवळ येत होता.. आणि मी... मी मात्र पुर्णतः अडकले होते... आणि एक दिवस माझं मन मी त्याच्याकडे मोकळं केलं... मला माहीत होत की मी सांगूनही काही च साध्य होणार नाहीये.. कारण he was already engaged.. पण मला माझ्या feelings त्याच्याशी share करायच्या होत्या.. आणि त्या मी केल्यात ...
त्याने खूप छान समजून घेतलं मला... अर्थात त्याच्यासाठी खूप मोठा धक्का होता तो...पण तरी हि माझ्याशी असलेली मैत्री त्याने कधीच तोडली नाही .. किंवा त्यात कधी दुरावा आणण्याचा हि कधी त्याने प्रयत्न केला नाही .. we were just like best friends sharing every moment of our life...
तो कायम माझा खूप मोठा आधार च बनत गेला ... मला कधीच त्याने कसलीच उणीव नाही भासू दिली ... त्याने खूप खूप काही केलं माझ्यासाठी.. खूप खूप हसलोत एकमेकांच्या सहवासात... खूप रडलोही आणि रडवलंही खूप :):)
पण आज ... आज तो माझ्याबरोबर नाहीये.. आणि इथून पुढे नसेलही ... असेल तो फक्त एक मित्र म्हणून... नुसता विचार केला तरी काटा उभा राहतो.. पण इथून पुढे हेच सत्य असणार आहे.. आणि मला ते स्वीकारावं लागेल..
तुझ्या आयुष्यात कोणी नसत तर खरंच तू मला स्वीकारलं असतंस का रे??? का उशीर केलास माझ्या आयुष्यात यायला.. आणि कायमच यायचं च नव्हत तर मग आलाच कशाला.. का????
फार उशीर झाला रे आपल्याला भेटायला.... फार उशीर...