कोण होते तिथे?

हा ध्वनी माझ्याच आवाजांचा
वाजले मग कोण होते तिथे?

हा ध्वनीही पैंजणांचा माझ्या
नाचले मग कोण होते तिथे?

हा ध्वनीही पावलांच्या माझ्या
चालले मग कोण होते तिथे?

हा ध्वनीही कोंडल्या श्वासांचा
धावले मग कोण होते तिथे?

हा ध्वनीही 'ईश्श' आवाजाचा
लाजले मग कोण होते तिथे?