अंदाज हे चुकवे
==================
आभाळाच्या निळाईतून रिमझिमता
विसावले मोतिक टपोरे ओघळताना..
निव्वळशंख हिरे पाचू लखलखता
तेजगर्भातून रंग उमलले टपटपताना..!!
आभाळाच्या निळाईतून रिमझिमता
तेजगर्भातून रंग उमलले टपटपताना..!
ऊनसावली सरमोती हळुवार सरसरता
गुच्छ फुलांचे जुळले अवचित झुलताना..
आभाळाच्या निळाईतून रिमझिमता
गुच्छ फुलांचे जुळले अवचित झुलताना..!
वादळ बिजली कुंद दिशांत बावरता
थेंबा थेंबातून हसले सुराणे भुरभुरताना..
आभाळाच्या निळाईतून रिमझिमता
थेंबा थेंबातून हसले सुराणे भुरभुरताना..!
कडवे कोरडे मेघ गरजती निथळता
ऋतुराजाचे अंदाज हे चुकवे कळताना.......
==================
स्वाती फडणीस........ १६-०६-२०१०