कललेला दिवस उतरंडीवरून,संध्येकडे
माघारी घरट्यात पाखर,आपल्या पिलांकडे
पाण्याच्या प्रवाहावर उडणारी वटवाघळ
हुरहुर अजूनही , स्तबद्धता मनाकडे
पसरलेले अजाण बाहु, प्रवाहाबरोबर
स्थितप्रत उभे युगानयूगे, दोन काठ
अजाणतेने विशालता मोजत,संथ सरितेची
साक्षीला हाच निसर्ग, उणेपणा मनाकडे
लोंबाळलेली उलटी चित्कारत वटवाघळ, झाडावर
भजन ऐकणार मढ, वाटेवर शेवटच्या
ऐकू नयेणारा आक्रोश नित्याचाच, मनाकडे