आठवणी

आठवणी

अचानक आले बोलावणे
सत्वर निघोणी येणे
नुकताच तर आलो होतो
ओली हळद निरखीत होतो

खाल्ले चार घास वसावसा
घेतला निरोप कसाबसा
हातातुनी हात सुटेना
नजरेतुनी नजर हटेना

पोहचताच रणांगणी
झडल्या स्वागताला फैरी
जोडिला तोफगोळे
ज्वालांनी आकाश लालपिवळे

विसरुनी नातीगोती
सुसाट सुटलो वेगाने
निर्दय मारेकरी
झालो मी पेश्याने

काळवेळेचे भान न उरले
माहीत नाही किती सरले
रक्तलांच्छित कोसळलो धरणी
काळजात सगींनी की आठवणी