भान

मोद उसळला उरी

साजरा करावा जरी

उभारी त्या मयुराची

येईल का ह्या उरी?

प्रतीक्षा ती कीती

जिवनात आशेपरी

प्रतीक्षेत तो चातक

निष्टा उमगेल का उरी?

भानच सुटले जगण्याचे

काट्यावरी धावे बाळ

संपले देणे निसर्गाचे

पुढे उभा माझाच काळ