निरुपण

निरुपण

हुरहुर मनी काहुर दाटले
नयन आभाळी मेघ दाटले
लागला ससेमिरा आठवणींचा
काचमणी ओघळू लागले

जाळू लागले पुनवेचे चांदणे
आठवू लागे हनुवटीचे गोंदणे
हृदयिच्या व्यथा सांगू कुणाला
एकलाच बसतो मी निरुपणाला