आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण
अलगत झेलयचा
तो दरवळतं असतोच आपण फक्त
त्याचा आस्वाद घ्यायचा
अंगणात टपोरा गुलाब फुलतो
पाहणाऱ्याला मोहून टाकतो
जवळ घ्यायला जातना काटा बोचतो
काट्यांचे बोचणे गुहित धरूनच त्याचा आस्वाद लुटायचा.......!!!!
आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण......
समोरचा उंच पहाड खुणावत असतो,
आपणही चढायला आतुर असतो,
बागडता बागडता कुठे तरी ठेचकाळतो
दगडा वर ठेचकाळणं गुहित धरूनच
शिखरावरचा मेघ पकडायचा....!!!
आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण............