रंगला निंद्रेत थकवा
लोचनी तृप्त व्हाया
गात्रेच शांत होती
कुशीत तुझ्याच याया
व्याधिस्त मीच असता
सोसली सवेची व्याधी
मांडीच असे उशाला
रात्रीचा दिवस कराया
न गमे काळ आता
सुखे अनंत जगी
स्वर्गात लोळतो मी
हेवा तुला अनंता
ओल्यात मीची असता
कळवळे काळीज आता
कोरड्यात हसे परी मी
ओल्यात निजे ती माता
चाले जगीच सर्वे
कौतुक काय त्याचे
ये! ये! म्हणे आनंदे
उचलून घेई साचे
तृषार्थ तू ही आहे
सावलीत ह्याची न्हाया
खरखरीत स्पर्श हाती
निःस्वार्थ हिची माया
लोभात ह्याची रामा
पडले किती अनंत
लोभीच जगी सर्वे
माया तिची प्रशांत
जगी फिरून केंव्हा
धडाशील मलाच देवा
लाभो उदर पुन्हा हे
स्वर्गी पून्हाची याया