खरंच?

खरंच?

खरंच का तिचे
माझ्यावर प्रेम होते
केले आयुष्य
जिच्यासाठी रिते

घेऊन आठवणींचे
पाठिवरी पोते
वणवण मन
भरकटत होते

चांदण्यात होरपळले
सावलीला भिते
चाळता प्रेमपत्रे
काया हि थरथरते

सांगून गेलीस
परत येते
पाणावले डोळे
पापण्या धुते