वेध तुझे लागता गं
झोत रोमांचित कायेला स्पर्शला
रक्तातील सोसाटा
धडधडत, धगधगत हृदयाला धडकला
प्रेमाळले मधुर शब्द
अन, कटाक्षात रम्य अर्थ साठलेला
उजळणी धुंद क्षणांची
अन लयबद्ध श्वासही बेताल झाला
आंवढ्यात जीव गोळा
अव्यक्त शब्दही उगा उसळ्या घेती
स्मृती तुझ्या दाटती गं
फिरे हुरहूर मुक भावनांभोवती
माझा मी न राहण्यास
सुक्ष्मसा तो स्पर्श होता पुरेसा
दाहक तेंव्हा होईच
उताविळ अंगप्रत्यंगाची भाषा