नव्हते मनांत तरीही
नव्हते मनांत तरीही,कसे अघटित घडले
त्या चित्त चोरट्याला,आपले म्हणून
बसले
होते पुढे शिकायचे,आईचे ऐकुन बसले
वधू परीक्षेस मी,का सजुन
बसले?
त्या हस~या छबित,मीच हरवून बसले.
त्या एका कटाक्षाने,घायाळ होवून गेले..
बोलणे असे आर्जवि,का मनास गुंतवावे.?.
ठेवले जे सांभाळून,का वाटे उधळावे?
असेल मी आवडली?,कितीदा मना पुसावे
येइल
का होकार,म्हणुनी किती झुरावे
येता होकार त्यांचा,मन पाखरू व्हावे.
वाटे
हे जिवन,त्या चरणी अर्पावे..
नव्हते मनात माझ्या,मग का असे घडावे?
या
गारुडास सांगा,काय नाव द्यावे?
आविनाश