जा मला विसरुन

माझ्या कुटुंबाची भव्य ढोली
ऐतखाऊ आळशांनी व्यापलेली
तु यावेस वाटते जवळी, पण
फांदीफांदीवर वासनेच्या पत्रावळी

मीच तुला स्वप्ने दाखविली
पण सालपटे सत्याची निघालेली
मलाच कित्येक बांडगुले लटकलेली
अन, आशेची मचाणं तुच बांधलेली

ह्या अशा घुसमटलेल्या वेळी
तुच पाहीजे होतीस भरावया पोकळी
ह्या विषण्ण वृक्षाच्या भोवताली
तुझी आठवणच सुरपारंब्या खेळी

मळभातही तुझ्या गालावर खळी
माझ्या भोगांची लांबलचक साखळी
अगं, कुकवावर तुझ्या आधीच सावली
मग का? गुंडाळू ही गुंतलेली भेंडोळी
           तुझ्या गळ्याभोवताली......