भरून आलेल आभाळ अन आवाज ढगांच्या गडगडाटांचा,
आताशा माला छंद जडलाय तुझ्याच कविता वाचायचा;
खवळलेला समुद्र अन प्रहार उसळत्या लाटांचा,
आताशा माला छंद जडलाय तुझ्याच कविता वाचायचा;
कोसळणारा पाऊस अन लखलखाट पडणाऱ्या विजांचा,
आताशा मला छंद जडलाय तुझ्याच कविता वाचायचा;
गहिवरलेले मन अन प्रवास सुकलेल्या अश्रुंचा,
आताशा माला छंद जडलाय तुझ्याच कविता वाचायचा.