तो क्षण किती वेगळा होता,
तु माझ्या समोर होतीस,
अगदी समोर,
मी हात उचलावा अन तुझ्या गालांचा स्पर्श व्हावा,
इतकी तु जवळ होतीस.
किती युगे लोटली आता,
पण प्रेम तेच,
तीच ओढ,
तीच हुरहुर,
अन मीही तोच.
पण माझी प्रिया तु ती नव्हतीस,
तु कुणी वेगळीच होतीस,
तो क्षण किती वेगळा होता,
तु माझ्या समोर होतीस...
जुनीच छबी तुझी मनात ठेवली होती जपून,
तु भेटलीस आणि तीही बसलो गमावून,
पुर्वी तुझा कोपरा अन कोपरा माझ्या मनात भरलेला,
आता त्या खुणाही माझ्या सारख्याच विरलेल्या,
काळाने आपली जादू केलीच तुझ्यावर,
नवीन तारुण्य, नवा तजेला,
वेगळाच होता तुझा बहर,
छानच दिसत होतीस तु आताही,
पण,
तेव्हा तर तुझ असण माझ होत,
आणि आता तुझ दिसणही माझ नाही,
तो क्षण किती वेगळा होता,
तु माझ्या समोर होतीस...
तु म्हणजे दुष्ट कोडे,
त्यावर उत्तर तुझे डोळे,
खोल सुंदर आणि पाणीदार,
आजही त्यात दिसले प्रेम अपार,
मग माझी सारी शंका मिटली,
आणि तुझी ओळख पटली,
तो क्षण किती वेगळा होता,
तु माझ्या समोर होतीस,
अगदी समोर...