आता कसलीच चिंता नको,
आता कसलाच गुंता नको,
मुक्तपणे आहे हसायचे,
मनभरून आहे जगायचे,
हसतांना अन जगताना आता
कुणाचे बंध नको,
आता कसलीच चिंता नको,
आता कसलाच गुंता नको.
कधी व्हायचे होते वारा,
कधी व्हायचे होते नदी,
कधी व्हायचे होते आकाश निळसर,
कधी पाऊस धारा सरसर,
पण यातले काहीच झाले नाही,
मला मीही होता आले नाही,
आता मला मी व्हायचे आहे,
आता नात्यांचीही खंत नको,
आता कसलीच चिंता नको,
आता कसलाच गुंता नको.