मोड!

चाललो कसामी,चाललो तसा मी
प्रश्न एवढामात्र होता,जगलो असा पुन्हा कसा मी
                      स्वप्न माझे मीच मोडितो,भावात मोडीत त्याच्या
                       भंगार पुन्हा तिच जाते , भावनेत ह्या बाजाराच्या
दुःखेच होती पुन्हा तीच  नाचत,भूतलावरती ह्या ईश्वराच्या
आभार त्याचे आजही देतो, कुडीत आहे प्राण ही माझ्या
                      आवरले मीच पुन्हा  स्वकरे, ओरबाडली जे का जना
                      टांगून पुन्हा आयुष्य खिळे, जनी पाहतो तोची कान्हा
नव्हतीच आशा कधी इथे ही , थाप पाठीवर त्याचीच यावी
विस्कटलेले सावरावया नव्याने, भेटू दे रे जन्म  नवा पुन्हा