शेवगा रसभरे सालन

  • ४ चांगल्या दलदार शेंगा (शेवग्याच्या) तासून कापलेले तुकडे
  • २ लहान कांदे सोलून आडवे तिडवे चिरलेले
  • १ टि स्पून लसुण व १ टि स्पून आले ठेचलेले
  • १ टि स्पून तिखट
  • ४ साधारण मोठ्या टोमॆटोचा रस
  • १ टि स्पून कोथिंबीर, पुदीना चिरलेला
  • १ टि स्पून साखर,१ टि स्पून मिठ
  • हिरव्या मिरच्यांचे तुकडे तुमच्या आवडी प्रमाणे कमी जास्त
  • १२ पाने कडिलिंब
  • पावशेर पाणी (१ ते दिड कप)
  • तुप ४ टि स्पून
३० मिनिटे
  1. कडईत तुप गरम करुन त्यात कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या.
  2. त्यात लसूण आले परतून घेऊन शेंगाचे तुकडे, तिखट घालून आणि पावशेर पाणी टाकुन शिजवावे.
  3. शेंगा शिजल्या की टोमॅटोचा रस व साखर घालून सारखे करावे. 
  4. मिठ, मिरच्या, कडिपत्ता घालून रस्सा जरासा जाडसर झाला की कोथिंबिर, पुदिना भुरभुरवून भात नाहितर पोळी बरोबर खाण्यास द्यावे.


मांसाहारी लोकांसाठी : ह्या रसदार शेवग्याचे सालनात सोडे, कोळंबी पण घालुन चवित बद्ल करता येतो.
माझि माय.... आई