ती......

मन आतुर झाले तेव्हा
ती खूप दूर होती....
मग मी वायुवेगाने
तिच्या दिशेने धावत गेलो....
ती तिथेच अजून निश्चल उभी असलेली पाहून
माझे मन मोर झाले....
आता, पुढे होउन तिला कवेत घेणार तोच
कळून चुकले की..
फाटत चालली आहे खाली धरती
अन् तिच्या आसवांचा समुद्र
रिता झाला आहे माझ्या या
हातावरती......

- सुभाष अक्कावार, नाशिक.