कोण मी?

कोण मी आहे तुझा?... कोणीच नाही...!

कोण तु आहेस माझी?... सर्व काही...!
मी असा भेगाळल्या भूमीपरी,
अन तुला बरसायचे मंजूर नाही...!
लागलो होते पणाला मी स्वत:
पण तुला जिंकायची इच्छाच नाही...!
का ऊन्हाशी एवढी सलगी तुझी?
काय माझी सावली घनगर्द नाही...?
तु प्रभा, माध्यान्ह, संध्या, तु निशा
पण तुझा मी सूर्य नाही, चंद्र नाही...!
शब्द माझे नेहमी खटकायचे
अन अतां मौनात माझ्या अर्थ नाही...?