माजलेली चाल त्याची माकडेही चालती
माणसाची क्षूद्रवॄत्ती माकडेही जाणती
भासणारे भाबडे ते रात सारी चाखती
रोज टोप्या सज्जनांना माकडे ही घालती
चोरदारी चोंबडे ते मान सारा सांडती
लाळघोट्या माणसाला माकडेही पाळती
माणसे ही स्वार्थ-साधू नागडेही राहती
पाहुनी हे वेड-चाळे माकडेही लाजती
लोचटांच्या या जगाच्या देखता चाली-रिती
तोंड मोठे लालसेचे माकडेही वासती
तोलताना माप सच्चे सूक्ष्म मावा चाखती
हाच आहे दोस्त त्याला माकडेही मानती